प्रतिनिधी/ म्हापसा
काँग्रेस पक्षातर्फे कृषी बीलच्या निषेधार्थ रविवारी सकाळी 9 वा. टॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शिवाजी मैदान डिचोली येथे या रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस भोलानाथ घाडी यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. व्यासपीठावर उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, माजी नगरसेवक आल्वारील उपस्थित होते.
कृषी टॅक्टर रॅलीला पीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत उपस्थित राहाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बार्देशचे अध्यक्ष व दक्षिणचे अध्यक्ष उपस्थित राहतील. कृषी बील मंजूर केले ते शेतकरी बांधवांना घातक आहे. सरकार सबसिडी देतात म्हणून सांगत आहे मात्र किती देणार हे सांगत नाही. सरकारने शेतकऱयांना मोबदला द्यायला पाहिजे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेती करीत नाही तर जेवण खाण मिळणे कठीण होईल. यासाठी काँग्रेस पक्ष याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
शेतकरी अद्याप शिकलेले नाबी याची जनजागृती करण्यासाठी आम्ही ट्रक्टर रॅली करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व शेतकरी बंधूंनी सकाळी 9 वा. डिचोली मैदानावर उपस्थित रहावे. सर्वांनी या रॅलीत सहभागी रहावे, गावोगावी फिरून दुपारी म्हापसा बोडगेश्वर मंदिराजवळ या रॅलीचा समारोह होणार आहे.









