बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य काँग्रेस कमिटी आज राजभवन चलो आंदोलन करणार आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. दरम्यान जागोजागी आंदोलन करणारे शेतकरी व इतर निदर्शक बुधवारी सकाळी बेंगळुरूच्या वेगवेगळ्या ठिकाणी जमले. परंतु कोरोना नियमांमुळे पोलिसांनी “राजभवन चलो” आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
मॅजेस्टिक क्षेत्रातील मौर्य सर्कल आणि स्वातंत्र्य उद्यानाशेजारी असलेल्या सिटी रेलवे स्टेशनवर शेकडो शेतकरी जमले आहेत. बेंगळूर शहर पोलिसांच्या माहितीनुसार कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या भागात शेकडो जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले, मॅजेस्टिक मधील रेल्वे स्थानक आणि आसपास ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी ड्युटीवर आहेत.
शहरातील विविध भागातून मोर्चांचे स्वातंत्र्य उद्यान येथे समारोप करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर राजभवनाकडे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.









