प्रतिनिधी /पणजी :
सत्तरीतील म्हादई अभयारण्यात वाघिणीसह एकूण चार वाघांच्या हत्याप्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वन खात्याच्या कार्यालयावर जाऊन निदर्शने करीत वन अधिकाऱयांना धारेवर धरले. यावेळी वन खात्याचे अतिरिक्त उपनसंरक्षक संतोष कुमार यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अधिकाऱयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने खात्याचा निषेध केला. वाघाची हत्या करणाऱयांवर तसेच या ठिकाणी अपयशी ठरलेल्या वनअधिकाऱयावर कारवाई करण्याची मागणी कॉंगेसतर्पे करण्यात आली.
वाघ ही राष्ट्रीय संपत्ती आहे. एकाच वेळी चार वाघांची हत्या होणे हे संपूर्ण देशासाठी दुदैवाची घटना आहे. म्हादई अभयारण्यात वाघांचे संरक्षण करण्यास वन खाते अपयशी ठरले आहे. त्यामुळे वन खात्याला जाब विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण या ठिकाणी असलेल्या अधिकाऱयाकडून आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. एकदम बेजबाबदार हे अधिकारी आहे. त्यांना वाघांची हत्या झाली याचे काहीच पडले नाही. तो कार्यायलात दारू पिऊन आल्याचा आम्हाला संशय आहे म्हणून त्यांच्याकडून अशी उत्तरे मिळाली. याची सरकारने तसेच पोलिसांनी चौकशी करावी. या बेजबाबदार वनअधिकाऱयांना सेवेतून काढून टाकावे, असे काँगेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
म्हादई अभयरण्यात वाघांना संरक्षण देण्यास वनखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हादई अभयाण्यात काम पाहणारे उपवनपालांना ताबडतोब सेवेतून काढून टाकवे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे या वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अभारण्यात काम करणारे अन्य वन खात्याची अधिकाऱयावर कारवाई करावी. म्हादई अभयाण्यात हे व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची आम्ही काँगेसतर्पे सरकारकडे मागणी करत आहे, असे यावेळी काँगेसचे वरद म्हार्दोळकर यांनी सागितले.
यावेळी महिला काँगेसच्या अध्यक्षा प्रमिता कुतिन्हो जनार्धन भंडारी तसेच अन्य कॉगेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. वन खात्याच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तसेच वनखात्याविरोधात घोषणाबाजी केली. या कार्यलयीतल एका कर्मंचाऱयाने चले जाओ असे हिंदी सांगितलने काँगेसच्या कार्यकत्यांनी त्याला धारेवर धारले. यावळी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोषीवर कारवाई करणारः अतिरिक्त वनसंरक्षक
म्हादई अभयारण्यात चार वाघांची हत्या झाली याचा तपास सुरु आहे. तसेच तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. मेलेल्या म्हशीच्या मासामध्ये विष घालण्यात आले sहोते ते मास खाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची सर्व तपासणी केल्यावर दोषिवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तसेच त्या भागात राहणाऱया त्या धनगर समाजाला लोकांनी इतरत्र हलविले जाणार आहे. तसेच म्हादई अभयारण्यात वन खात्याच्या कर्मचारी कमी पडत असल्याने आणखी कर्मचारी भरती करण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहे, असे यावेळी अतिरिक्त वनसंरक्षक संतोश कुमार यांनी सांगितले.









