प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची आज बुधवार दि. 2 फ्sढबुवारीची गोवा भेट पुढे ढकलण्यात आली असून ते आता शुक्रवार 4 फ्sढबुवारी रोजी गोव्यात येणार आहेत. त्यांचा उर्वरीत कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असून सांखळीत बोडके मैदानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात जाहीरसभा व निर्धार मेळावा आयोजित केला आहे. तेथून ते 40 ही मतदारसंघातील काँगेस, गोवा फ्ढाŸरवर्ड उमेदवार व नेत्यांशी ऑनलाईन संपर्क साधून संवाद साधणार आहेत.
एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी माहिती दिली की केंद्रिय अर्थसंकल्पावर संसदेत राहुल गांधी आपली प्रतिक्रिया देणार असल्याने आणि 3 फेब्रुवारी रोजी रायपूर येथे शहीदांच्या सन्मानार्थ स्मारकाच्या भूमीपूजनासाठी ते जात असल्याने गोवा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
यावेळी जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, ऍड श्रीनिवास खलप, महिला अध्यक्षा बिना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर उपस्थित होते.









