प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाचा कहर आता कमी होवू लागला आहे. दररोज दोन ते अडीचशेच्या दरम्यान कोरोना बाधित नव्याने सापडू लागले आहेत. तर संशयित म्हणून दररोज अडीचशे ते तीनशे जणांचे स्वॅब तपासले जात आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये रिकामे बेड असल्याचे चित्र आहे. सातारकरांचा जिल्हा रुग्णालयाबरोबरच जम्बो हॉस्पिटलवरच भरोसा आहे. त्यामुळेच तेथे उपचार घेणारे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत. मृत्यूदर रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान असून त्या अनुषंगाने प्रशासन प्रयत्न करत आहेत. दिवसभरात 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सातारा तालुक्यात 6 जणांचा समावेश आहे. रात्री आलेल्या अहवालात …. बाधित झाले असून 45 हजाराचा आकडा ओलांडला आहे.
जिह्यात कोरोना बाधितांचे आता प्रमाण कमी होत चालले आहे. मात्र दिवसभरात मृत झालेल्यामध्ये सातारा 6, कोरेगाव 1, पाटण 1, फलटण 3, वाई 1 असे 12 जण आहेत. आतापर्यंत 1 लाख 79 हजार 258 जणांचे स्वॅब तपासले गेले आहेत. त्यापैकी 45 हजार 70 एवढे बाधित आतापर्यंत बाधित झाले आहेत. 38 हजार 661 जण बरे होवून घरी गेले. तर 1 हजार 492 जणांचा बळी गेला असून सध्या 4 हजार 917 जण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱयाच्या सणाच्या खरेदीला कोरोनाचे नियम पाळून सर्वच जिल्हावासिय बाहेर पडत आहेत.
325 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 265 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत 325 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 265 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
265 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, कराड येथील 16, फलटण येथील 19, कोरेगाव येथील 22, वाई येथील 16, खंडाळा येथील 23, रायगाव येथील 19, पानमळेवाडी येथील 4, महाबळेश्वर येथील 16, दहिवडी येथील 15, खावली येथील 3, म्हसवड 8, पिंपोडा येथील 6 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 77 असे एकूण 265 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
12 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये मोरे कॉलनी (ता. सातारा) 75 वर्षीय पुरुष, विजयनगर (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, कुमठे (ता. कोरेगांव) 95 वर्षीय पुरुष तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये माजगाव (ता. पाटण) 70 वर्षीय महिला, तरडगाव (ता. फलटण) येथील 70 व 92 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा 72 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले जामखेड रोड (ता. सातारा) 64 वर्षीय पुरुष, निंबळक (ता. फलटण) 55 वर्षीय पुरुष, विरमाडे (ता. वाई) येथील 74 वर्षीय पुरुष, सदरबझार 70 वर्षीय महिला, अनंत विहार (ता. सातारा) येथील 56 वर्षीय पुरुष अशा 12 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.








