लोकांना वाटते अनोखे वरदान, प्रत्यक्षात हा अभिशाप
चांगली स्मरणशक्ती कुणाला आवडत नाही, अनेक लोक मिनिटांपूर्वीच गोष्ट विसरून जातात. उत्तम स्मरणशक्तीसाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करत असतात. परंतु एका महिलेची स्मरणशक्ती नैसर्गिक स्वरुपातच अत्यंत चांगली ओ, परंतु तिची हीच शक्ती तिच्यासाठी अभिशाप ठरत आहे.
ऑस्ट्रेलियाची रहिवासी रेबेका शारॉक 31 वर्षांच्या आहेत, रपंतु त्यांना 18 वर्षे वयापासून आतापर्यंतच्या सर्व घटना स्मरणात आहेत. कुठल्या दिवशी काय घडले, आपण काय केले हे त्यांना इत्यंभूत आठवते. प्रत्यक्षात रेबेका यांना एक अत्यंत विचित्र सिंड्रोम हायपरथाइमेसियाचा विकार आहे. जीवनातील अत्यंत छोटय़ा घटना आठवणीत ठेवण्याच्या सिंड्रोमला हायली सुपीरियल ऑटोबायोग्राफिकल मेमरी म्हणजेच हायपरथाइमेसियाचे नाव देण्यात आले आहे.

या सिंड्रोममध्ये लोकांना स्वतःच्या जीवनाशी निगडित अत्यंत किरकोळ घटनाही आदल्या घडलेल्या घटनांप्रमाणे आठवणीत राहतात. रेबेका यांच्यासोबतही असेच घडत आहे. 2007 मध्ये कुठल्या महिन्याच्या कुठल्या दिवशी काय घडले हे रेबेका अत्यंत सहजपणे सांगू शकतात. हा सिंड्रोम असणारे जगात केवळ 80 लोकच आहेत.
विसरण्याचा करते प्रयत्न
जानेवारी 2004 नंतरची प्रत्येक गोष्ट आठवणीत असल्याचे रेबेका सांगतात. अनेक लोकांना एवढी उत्तम स्मरणशक्ती वरदानापेक्षा कमी नसल्याचे वाटते. परंतु रेबेका यांच्यासाठी ही स्मरणशक्ती म्हणजे अभिशाप आहे. लोकांनी म्हटलेल्या गोष्टी आणि घटना आठवणीत राहत असल्याने त्याबद्दल डोक्यात विचार सुरू राहतात. याचमुळे या गोष्टी विसरू पाहते, परंतु विसरू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. झोपण्यासाठी गेंगाट आणि लाइट्स सुरू ठेवण्याची गरज भासते. कारण शांत वातावरणात झोप येत नाही आणि जुन्या गोष्टी डोक्यात घोळत राहत असल्याचे त्यांचे सांगणे आहे.









