पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री कसबा गणपतीचे, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशजयंतीला ग्राम प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने कसबा गणपती चौक येथे गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे.
यावेळी कसबा पेठेतून सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी पेलणारे पीएमपीएमएलचे वाहक व चालक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रभात बँड, शिववर्धन व संघर्ष ही ढोलताशा पथके वादनाद्वारे श्री कसबा गणपतीला मानवंदना देणार आहेत. यासाठी सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.









