कर्नाटकने पाणी वळविल्याच्या संशयाला बळकटी
उदय सावंत/ वाळपई
कळसा नदीच्या पाण्याचा प्रवाह गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा बऱयाच प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्नाटकने कळसा-भांडुरा प्रकल्पातून पाणी वळविल्याच्या संशयाला बळकटी प्राप्त होऊ लागली आहे. याचे दुष्परिणाम येणाऱया काळात गोव्यातील म्हादई नदीच्या प्रवाहावर होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. उस्ते सत्तरी येथे ज्या कळसा नदीचा प्रवाह मुख्य म्हादई नदीला मिळतो त्याचे पाणी बऱयाच प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे.
कळसा व म्हादई नदीचा संगम होत असलेल्या ठिकाणी भेट दिली असता कळसा नदीच्या प्रवाहात प्रचंड प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वषी त्याचे दुष्परिणाम म्हादई नदीच्या प्रवाहावर झाल्याचे जाणवले होते. येणाऱया काळात ही परिस्थिती अधिक भयावह होऊन म्हादईच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दीड किलोमीटर प्रवाहावर परिणाम
जवळपास साडेतीन किलोमीटर अंतराचा हा नदीचा प्रवाह बऱयाच प्रमाणात कमी झाल्याचे स्थानिक भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सदर भागातील नदीच्या काठावर असलेल्या कृषी बागायतीच्या उत्पादकांनी यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना गेल्या शेकडो वर्षांपासून कळसा नदीला प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा प्रवाहाच्या माध्यमातून म्हादई नदीला भिडला जात होता. मात्र गेल्या वर्षापासून या नदीच्या प्रवाहात पन्नास टक्क्मयांनी घट झाली आहे. यंदा त्यात आणखी घट झाल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार
म्हादई नदीच्या प्रवाहावर अनेक ठिकाणी जलसिंचन खात्याने बंधारा योजना राबविण्यात आलेली आहे. यामुळे निदान एक महिना तरी याचे स्पष्ट दुष्परिणाम नागरिकांना जाणवणार नाहीत. मात्र त्यानंतर पाण्यासाठी बऱयाच प्रमाणात संघर्ष करावा लागणार असल्याचे शेतकरी बांधवांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
धबधब्यांच्या पाण्यात झाली घट
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कर्नाटक सरकारने कळसा नदीचे पाणी वळविल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम पर्यटकांचा आकर्षण केंद्रबिंदू ठरलेल्या बाराजण जळवती व लाडक्मयाचो ओझर या धबधब्यांवर झाला असून सदर धबधब्याच्या पाण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झाल्याचे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार समजते.
पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बाराजण जळवतीचा ओझर व लाडक्मयाचो ओझर या धबधब्यांवर दुष्परिणाम झाला आहे. पाण्याचा प्रवाह बऱयाच प्रमाणात कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे कर्नाटक सरकारने कळसा नदीचे पाणी वळविल्याचे सिद्ध झाले असून गोव्याने यासंदर्भात दखल घेतलेली आहे. मात्र येणाऱया काळात नागरिकांनी या संदर्भात आपला आवाज बुलंद न केल्यास त्याचे थेट परिणाम पिण्याचे पाणी, शेती व्यवसाय, जैवविविधता, बंधारा योजना अशा अनेक क्षेत्रावर होणार असल्याचे केरकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.









