प्रतिनिधी/संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील पडक्या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत सापडला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
गेली दोन दिवस परिसरात कुजकट वास येत होता. मात्र सीताराम नेवरेकर यांच्या घरच्या लोकानी दुर्लक्ष केले, मात्र आज वास जास्तच येत असल्याने नेवरेकर यांनी पडक्या विहीरीत डोकावुन पाहीले असता एक प्राणी कुजलेल्या अवस्थेत दिसुन आला. अधिक लक्ष देवुन पाहीले असता तो प्राणी बिबट्या असल्याचे लक्षात आले. भक्ष्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleधोका वाढला : दिल्लीत रविवारी 10 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण
Next Article विक्रमी! देशात 24 तासात 1,68,912 बाधितांची नोंद









