मुंबई : दागिन्यांच्या व्यवसायात असणाऱया कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ येत्या 16 मार्चला भारतीय शेअर बाजारात सादर केला जाणार आहे. कल्याण ज्वेलर्सचा 1 हजार 175 कोटी रुपयांचा आयपीओ 16 मार्चला खुला होणार असून 18 मार्चला इशु बंद होईल. आयपीओअंतर्गत प्रति समभागाचा दर 86-87 रुपये इतका ठेवण्यात आला आहे. आयपीओत 800 कोटी रुपयांचे ताजे इक्वीटी समभाग सादर केले जातील. 2 लाख रुपये मुल्याचे समभाग कंपनीने आपल्या योग्य कर्मचाऱयांसाठी राखीव ठेवलेले आहेत. यांना प्रति समभाग 8 रुपये सवलत दिली जाणार असल्याचेही कल्याण ज्वेलर्सने स्पष्ट केले आहे.
दागिन्यांच्या बाजारातला वाटा
आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारतीय ज्वेलरी बाजारात तनिष्कचा वाटा 3.9 टक्के इतका राहिला आहे तर संघटीत दागिन्यांच्या बाजारपेठेत 12.5 टक्के इतका वाटा राहिला आहे. कल्याण ज्वेलर्सचा दागिन्यांच्या बाजारपेठेतील वाटा 1.8 टक्के इतका आहे. तर संघटीत दागिन्यांच्या बाजारात 5.9 टक्के इतका वाटा राहिला आहे.









