बेंगळूर/प्रतिनिधी
या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) रेड अलर्ट बजावला आहे.
आयएमडी बेंगळूरचे संचालक सी.एस. पाटील यांनी यांनी, गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात अतिवृष्टीमुळे उडुपी, दक्षिणा कन्नड, उत्तरा कन्नड, चिकमंगळूर, शिवमोगा, कोडगू आणि हसन येथे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.