मांड्या/प्रतिनिधी
मंड्या जिल्हाधिकारी एम.व्ही.व्यंकटेश यांनी मालवली तहसीलच्या कोरोना तपासणी केंद्राची पाहणी केली. कर्मचाऱ्यांना संरक्षण उपकरणे मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला चांगलेच फटकारले. तपासणी केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट, मास्क व सॅनिटायझर्सची वेळेवर उपलब्धता करण्याची सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी, जर एखाद्या व्यक्तीमध्ये सामान्य लक्षणे आढळल्यास वडरणहळ्ळी कोविड सेंटरमध्ये त्याला अलग ठेवणे आवश्यक आहे. अधिक लक्षणे असल्यास रूग्णाला मंड्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आमदार के.अंदोन्नी गौडा, तहसीलदार चंद्रमोली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विरभद्र आदी उपस्थित होते.