बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार एच. के. पाटील यांनी सोमवारी कर्नाटक राज्य सरकारने बेंगळूरमधील कोरोना मृत्यूशी संबंधित आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे.
यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत शहरात झालेल्या एकूण मृत्यूची नोंद लक्षात घेता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार काहीतरी लपवत आहे, असे आमदार पाटील यांनी म्हंटले आहे. या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान शहरात एकूण ४९,१३५ मृत्यूची नोंद झाली होती, तर २०१९ मधील याच कालावधीत ३७,००१ मृत्यूची होती.
३१ ऑगस्टपर्यंत, कर्नाटकच्या आरोग्य विभागाने १० मार्चपासून ५,७०२ मृत्यूची नोंद केली आहे.









