बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी सकाळी सुमारे ३५ हुन अधिक शेतकरी संघटनांनी कृषी उत्पन्न विपणन समिती अधिनियम आणि कर्नाटक भूमी सुधार अधिनियमातील दुरुस्तीचा निषेध नोंदविले. यावेळी शेतकरी संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी बेंगळूर आणि आसपासचे मोठे महामार्ग रोखले.
बेंगळूर शहरासह अनेक ठिकाणी झालेल्या निषेधामुळे तुमकूर रस्ता, म्हैसूर रोड आणि यशवंतपूर कमी प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली.









