प्रतिनिधी/ बेळगाव
भाजप नेते किरण जाधव यांची कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य अशोक गस्ती यांनी ही निवड जाहीर केली आहे.
किरण जाधव यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले असून जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.









