बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा केवळ खुर्ची वाचविण्यात व्यस्त आहेत. परिणामी, राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. अशी टीका कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. राज्यात नेतृत्व बदलाच्या भीतीने ते आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान भाताच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत पण मुख्यमंत्र्यांना याची चिंता नाही. राज्य सरकारने धान्य खरेदीसाठी किमान क्विंटल दर तसेच क्विंटल ५०० रुपये आधार किंमत जाहीर करून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.
शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकरी व शेतीच्या संरक्षणासाठी प्रभावी पावले उचलावीत. कृषी उत्पन्न घेण्यासाठी खरेदी केंद्रे स्थापन करावीत. राज्य सरकारने गंभीर परिस्थितीत वीजदर वाढीची घोषणा करून लोकांच्या जखमेवर मीठ शिंपडले आहे. विजेचे दर वाढवून जनतेला तातडीने दिलासा द्यावा.
तसेच राष्ट्रवादाची हाक देणारी भाजपा आता प्रत्येक समुदायासाठी विकास महामंडळ स्थापन करून जातीवादी राजकारण करीत आहे. यावरून हे सिद्ध झाले आहे की भाजप सत्तेत राहण्यासाठीसुद्धा तत्त्वांशी तडजोड करत आहे. कॉंग्रेसवर व्होट बँकच्या राजकारणाचा आरोप करणारा भाजप प्रत्येक समाजासाठी महामंडळांची घोषणा करुन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, अशीही टीका शिवकुमार यांनी केली आहे.









