बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी शिक्षक मित्र या मोबाईल अॅपचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध भागधारकांना मदत करण्याच्या उद्देशाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या विनंतीनुसार हे अॅप विकसित केले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत या अॅपचे सादरीकरण केले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या वेळी विद्याविनीता आणि शिक्षण यात्रे या दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले.









