बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प ८ मार्चला राज्य विधानसभेत सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली. विधानसभेत मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
विधिमंडळ अधिवेशन ४ मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी “एक राष्ट्र-निवडणुका” या विषयावर पहिले दोन दिवस चर्चा केली जाणार आहे. विधिमंडळ अधिवेशन मार्च अखेर संपेल अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी अर्थ पोर्टफोलिओ संदर्भात मंत्री आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत अर्थसंकल्पीय संबंधित बैठका सुरू केल्या आहेत.