बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरु असताना बेलथांगडी तालुक्यातील उजीरे येथील ग्रामपंचायत निवडणूक मतदान मतमोजणी केंद्राबाहेर पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे.
एसपी बी. एम. लक्ष्मी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या युवकाची नावे मोहम्मद हर्षद (वय २२), दाऊद (वय ३६ आणि इसाक (वय २८) अशी आहेत. ते सर्व बेलथांगडी तालुक्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.
एसपी यांनी पाकिस्तान समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीची व्हिडीओ क्लिप तांत्रिक पथकाद्वारे तपासली जात आहेत, ती व्हायरल झाली आहे. पोलिसांना या घटनेदरम्यान मोबाइल फोनमध्ये आणखी दोन व्हिडीओ क्लीपिंग्ज सामान्य लोकांकडून मिळाल्या आहेत. सर्व व्हिडिओ क्लिपिंगची तपासणी केली जात आहे. तपास सुरू आहे, असे ते म्हणाले.









