बेंगळूर : प्रतिनिधी
कर्नाटक राज्य निवासी डॉक्टर संघटनेने २९ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. निवासी डॉक्टरांच्या या संघटनेने २९ नोव्हेंबरपासून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या ओपीडी आणि ऐच्छिक ओटी (आपत्कालीन सेवा वगळून) यासह सर्व वैकल्पिक सेवा मागे घेतल्या आहेत.
कर्नाटक असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या सदस्यांनी सरकारला तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्यादा पात्र फ्रेशर्स डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आणि त्यांना दीर्घकालीन सेवेसाठी प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले आहे. तिसऱ्या लाटेच्या तयारीबद्दल सरकारला सादर केलेल्या अहवालात, सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील हाउस सर्जन, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशालिटी डॉक्टरांचा समावेश असलेल्या असोसिएशनने म्हटले आहे की, पात्र फ्रेशर्सची नियुक्ती करणे आणि त्यांना वरिष्ठ तज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण देणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.