चिक्कबळ्ळापूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून प्रशासन यंत्रणा देखील तितक्याच ताकदीने कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकार कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील १,५२१ गावांपैक्की १,१२६ गावे सध्या कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यासाठी हो मोठी दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गामीण भागात कोरोनाचा धोका वाढत होता. सर्वात जास्त रुग्ण हे ग्रामीण भागात सापडले आहेत.
दरम्यान, चिंतामणी तालुक्यातील मिंडीगल ग्रामपंचायत हद्दीत २४ मे पासून एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही, जी जिल्ह्यातील पहिली कोविड-मुक्त ग्रामपंचायत बनली आहे. दरम्यान,यामध्ये एकूण ५,०५२ लोकसंख्या असलेली १५ गावे आहेत आणि त्यांची तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पंचायत विकास अधिकारी सय्यद कलीम उल्ला म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलबाबत सतत जागरूकता वाढविण्यासारखे प्रयत्न होत आहेत. मिंडीगलचे जिल्हापरिषद अध्यक्ष एम.एस. विजयकुमार हे घरांच्या स्वच्छतेचे निरीक्षण करतात आणि आशा कामगार घरोघरी जाऊन घरांची तपासणी करतात, असे ते म्हणाले.
दरम्यान राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्य सरकारने काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. तर ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. दरम्यान, राज्यात उरलेल्या जिल्ह्यांचीही अनलॉकच्या दिशने वाटचाल सुरु आहे.