मंगळूर/प्रतिनिधी
राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्यावर मंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे अनुभवी नेते फर्नांडिस यांचे अंतर्गत जखमांचे निदान झाल्यानंतर इंटिव्हन्स केअर युनिट (आयसीयू) मध्ये आहेत, तर मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
ते सोमवारी रुग्णालयात डायलिसिससाठी गेले असता त्यांनी नियमित व्यायाम करत असताना डॉक्टरांना आदल्या दिवशी पडलेल्या घटनेची माहिती दिली. तथापि, काही चाचण्यांनंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं जात आहे.
फर्नांडिस हे २०१ पर्यंत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात सरकारमध्ये केंद्रीय वाहतूक, रस्ते आणि महामार्ग मंत्री होते. त्याच कार्यकाळात त्यांना कामगार व कर्मचारी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता.