बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूविरूद्ध जागरूक राहण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी अद्याप ही धोका टळलेला नाही, त्यामुळे सावध रहा असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोरोनाचा धोका संपलेला नाही. नवीन वर्षात प्रवेश घेताच आम्ही साथीच्या रोगाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, खबरदारी घ्यावी तसेच सुरक्षित रहावे व सरकारला सहकार्य करावे असे आवाहन केले.
लपून बसू नका, तपासणी करा
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना बेपत्ता झालेल्या प्रवाश्यांनी पळून जाण्याऐवजी चौकशीसाठी सहकार्य करा असे आवाहनही केले. येडियुरप्पा यांनी गेल्या दोन महिन्यांत राज्यात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी. आरोग्य मंत्रालयामार्फत देश आणि राज्यात सर्वत्र पसरलेल्या यूके विषाणूचे परीक्षण केले जात आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याची चाचणी केली पाहिजे. बाहेरून आलेल्यांनी लपून बसण्याऐवजी, चाचणी करून घ्या कारण त्यातच त्यांचे आणि इतरांचेही हित आहे.
कोरोना मार्गदर्शक सूचनांमध्ये आणखी काही बदल होतील का असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नाही. अद्याप कोणताही बदल झालेला नाही. या संदर्भात दिल्लीहून येणाऱ्यांना नव्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. या क्षणी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, असे ते म्हणाले.