बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंगळवारी बेंगळूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. यावेळी शेखावत यांनी जलमंत्री मिशनच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री, गृहमंत्री आणि कायदामंत्री बसवराज बोम्माई, लघु पाटबंधारे मंत्री जे. सी. मधुस्वामी आणि मुख्य सचिव पी. रविकुमार यांच्यासह अन्य उच्च अधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्याच्या सुरूवातीस, केंद्राने वर्ष २०२०-२१ मध्ये जल जीवन मिशनचा भाग म्हणून ५००८.७९ कोटी रुपयांच्या वाढीव वाट्याला मंजुरी दिली आहे. २०२३ पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे.









