बेंगळूर / प्रतिनिधी
कलबुर्गी येथील जयदेव कार्डिओव्हँस्क्यूलर हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांपैकी ५ डॉक्टरांचे रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आले आहेत. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले आहे.
एका रुग्णावर पाच डॉक्टर आणि कर्मचारी यांनी उपचार केले होते. त्याला ताप आल्याने त्या रुग्णाने आपली कोरोना चाचणी केली होती. पण काही तासांनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना समजले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. सेदम तालुक्यातील हा रहिवाशी आहे. ताप आल्यानंतर त्याने स्वॅब तपासणीसाठी दिले होते, पण जयदेव रुग्णालयातील डॉक्टरांना याविषयी माहिती दिलेली नव्हती. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जयदेव रूग्णालयाच्या कर्मचार्यांना सतर्क केले आणि ३१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आता ३१ पैकी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.