बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे चिंतेत असलेले आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी रविवारी तज्ञांची बैठक बोलावली आहे. बैठकीला कोविड -१९ वरील राज्य तांत्रिक सल्लागार समिती (टीएसी), कर्नाटक उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले टास्क फोर्स आणि पॅनेल्स उपस्थित असतील . टीएसी सदस्याने सांगितले की, “ बैठकीत वाढता सकारात्मकता दर, दुसरी लाट हाताळण्यासंदर्भात राज्याची तयारी, सर्वांसाठी उपचार, घरातील अलगीकरण प्रकरणांवर नजर ठेवणे आणि लसीकरण वाढीसंदर्भात तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.” शनिवारी कर्नाटकात ६,९५५ नवीन रुग्ण आढळले. तर एकट्या बेंगळूरमध्ये ४,३८४ रुग्णांची नोंद झाली आहे.