बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी कर्नाटकातील किमान ७०,७७३ आरोग्य सेवा कर्मचार्यांना कोविड -१९ ही लस देण्यात आली आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केले आहे. १९ जानेवारी रोजी १५,२२३ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दिवसाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत राज्यात ४७ टक्के लसीकरण झाले.
सोमवारी कोविड -१९ लसीकरण मोहिमेदरम्यान राज्यात एकूणच ४७ टक्क्यांची नोंद झाली होती, ती रविवार आणि शनिवारी अनुक्रमे ५८.४ आणि ६३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.