बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यभरात १,३७० जणांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंगळवारी सांगितले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक ५५७ रुग्ण आहेत आणि धारवाडमध्ये सर्वाधिक १४ जणांचा मृत्यू झाला आहे. झाले आहेत. राज्यभरातील विविध रूग्णालयात १,२९२ रूग्णांवर उपचार सुरू असून १जून पर्यंत आतापर्यंत २७ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात ब्लॅक फांगसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता आहे. दरम्यान, रविवारी केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी यांनी ब्लॅक फांगसच्या उपचारासाठी लागणारी औषधे येत्या दोन ते तीन दिवसांत मुबलक प्रमाणात उप्लब करून दिली जातील, असे म्हंटले होते.