बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात बाधितांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी राज्यात ४९ हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली. यासह राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५,१७,०७५ झाली. राज्यात २४ तासात ४९,०५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात कोरोनावर मात करून १८,९४३ रुग्ण घरी परतले आहेत. राज्यात सकारात्मकतेचा दर वाढून २९.८३ टक्के झाला. गुरुवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, गुरुवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १७,२१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात दररोज २० हजारच्यापुढे कोरोना रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, गुरुवारी शहरी जिल्ह्यात २३,७०६ नवीन प्रकरणांची भर पडली. तर ४,१४९ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. येथे २४ तासात १३९ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









