बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट सुरूच आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त होती. शुक्रवारी राज्यात ३,३१० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. याचबरेबर ६,५२४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर ११४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १,०७,१९५ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात शुक्रवारी कोरोना सकारात्मकता दर २.०९ टक्के होता.
दरम्यान, राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सांख्य कमी कमी होत चालली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ६१४ रुग्णांची नोंद झाली. याच वेळी १,४०१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर १७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.









