बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनासंक्रमित रुग्णांच्या संख्येत गुरुवारी वाढ झाली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत कमी जास्त वाढ होत आहे. गुरुवारी राज्यता मागील २४ तासात १,४३२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यात जास्तीत जास्त ३२६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३१८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात गुरुवारी १,५३८ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर या काळात २७ लोकांचा मृत्यू झाला. यासह राज्यात सध्या कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे २१,१३३ वर पोहोचली आहेत.
दरम्यान राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये, उडुपीमध्ये १६२ नवीन संक्रांमीत रुग्णांची नोंद झाली आहे. म्हैसूरमध्ये १०३, हसन जिल्ह्यात ९४, कोडगू जिल्ह्यात ७२, चिकमंगळूर जिल्ह्यात ३२, चामराजनगरमध्ये ६, कोलारमध्ये २०, मंड्यामध्ये ३०, शिवमोगामध्ये ४७, तुमकुरुमध्ये ४६, उत्तरा कन्नड जिल्ह्यात ४२, बेळगाव ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ०.८० टक्के होता.
बेंगळूरमध्ये २९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दक्षिण कन्नड जिल्ह्यात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात ३८५ रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले.