बुधवारी ३१४६ नवीन रुग्णांची भर
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी होत आहे. बुधवारी राज्यात ३,१४६ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. गेल्या कित्येक दिवसांपासून, राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा घरी परतणार्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
बुधवारी बेंगळूरमध्ये १,६१२ नवीन कोरोना रुग्ण सापडले. बुधवारी राज्यात ,७३८४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. राज्यात बुधवारी एकूण ५५ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यापैकी २३ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत ११,०४६ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
राज्यात बुधवारपर्यंत कोरोनाचे एकूण ६८,१६१ सक्रीय रुग्ण होते. यापैकी ४३,७६० रुग्ण हे बेंगळूर मधील आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी ४,४५७ रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परतले. शहरात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,८०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









