बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मंगळवारी राज्यात ८ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली. तर कोरोनामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यात मंगळवारी ६७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात मंगळवारी ८७७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या बुलेटिननुसार दिलासा देणारी बाबा म्हणजे मंगळवारी ६,०७९ रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले आहेत.
दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून ७,८६१७ झाली आहे. मंगळवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १३,००८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बंगलौर शहरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढतच आहे. मंगळवारी जिल्ह्यात ५५०० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ४४१५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. मंगळवारपर्यंत ४,९१० रूग्णांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान मंगळवारी बेंगळूरमध्ये कोरोनामुळे ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









