बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील पाच जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बेले मोनप्पा हेगडे यांना भारताच्या दुसर्या क्रमांकाच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.दरम्यान एक पद्मविभूषण, एक पद्मभूषण आणि तीन पद्मश्री पुरस्कार असे एकूण ५ पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
चंद्रशेखर कंबार यांना पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. यावर्षी कला क्षेत्रातील मठा बी मंजम्मा जोगती यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तसेच रंगास्वामी लक्ष्मीनारायण कश्यप यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. तर के. वय. व्येंकटेश यांना पद्मश्रीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेया आहे.









