बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोविड -१९ लस घेतलेल्या शिवमोगा येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही मृत्यूची पुष्टी केली परंतु त्यांचा लस घेतल्याने मृत्यू झाला नसल्याचे म्हंटले आहे.
मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कर्नाटकातील शिवमोगा मधील झालेला मृत्यू लसीकरणाशी संबंधित नसल्याचे म्हंटले आहे.
शिवमोग्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी नागराज यांनीही मृत्यू लसीशी संबंधित नसल्याचे सांगितले. मृत व्यक्ती ५८ वर्षांचा पुरुष आहे. ते जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित डॉक्टर होते. हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांना हृदय व मधुमेहाचा त्रास होता, असे नागराज यांनी सांगितले.