बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसागणिक कोरोना बाधितची संख्या वाढतच आहे. राज्यात कोरोनाने एकूण ४ लाखाहून अधिक रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६७,४४३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी ७,८६६ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या नवीन घटनांसह राज्यात कोविड रुग्णांची एकूण संख्या वाढून ४,१२,१९० झाली आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत ३,०८,५५७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी ७,८०३ रुग्णांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आता ९६,९१८ रूग्ण उपचाराधीन आहेत. कोरोनामुळे आता पर्यंत एकूण ६,६८० रुग्णांचा मृत्यू झाला.









