प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्नाटकातील बेल्लारीतून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला होणारा ऑक्सिजनचा पुवठा कर्नाटक सरकारने गुरुवारी रोखला. यामुळे कोल्हापूरसह सातारा,सांगली जिह्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत होण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारणी चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच हा पुरवठा सुरळित होईपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिह्यातून कोल्हापूरला ऑक्सिजन पुरवठा होईल, असे नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिह्यासह पश्चिम महाराष्ट्राला कर्नाटकातील बेल्लारी ऑक्सिजन फ्लांटमधून सुमारे 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच कर्नाटख सरकारने गुरुवारपासून हा ऑक्सिजन पुरवठाच अचानक थांबविला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आधीच ऑक्सिजनचा ताळमेळ घालून त्याचा पुरवठा करताना जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यातच हे नवीन संकट निर्मार झाल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारणा केली.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकार दर दोन दिवसांनी देशातील ऑक्सिजन स्थितीचा आढावा घेते. त्यामध्ये दुर्देवाने कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन कमी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सिंहाचा वाटा हा कोल्हापूर जिह्याचा आहे. याबाबत गुरुवारी सकाळी आपण राज्य सरकारच्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर कर्नाटककडून महाराष्ट्रासाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पुर्ववत करावा, यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा सुरु झाली आहे. हा पुरवठा सुरळित होईपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिह्यातून कोल्हापूर जिह्यासाठी ऑक्सिजन पुरवठा कशा पध्दतीने होईल, याचे नियोजन केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









