बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी कर्नाटकात दोन गंभीर एईएफआय घटनांची नोंद झाली आहे. या दोन घटना धारवाड आणि बळ्ळारी येथे घडल्या आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या लसीकरण विभागाच्या उपसंचालक डॉ. रजनी नागेशराव यांच्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला या व्यक्तीला लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणानंतर या व्यक्तीला त्रास झाला.
दरम्यान लसीकरणानंतर, तो दोन तास सामान्य होता परंतु नंतर त्याला उच्च-स्तरीय ताप, थंडी वाजून आल्याने त्याला पुढील व्यवस्थापनासाठी त्यांना बळ्ळारी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
लसीकरणानंतर त्रास होणे चिंताजनक आहे का असे विचारले असता, नागेशराव यांनी रुग्णाची तपासणी केली जात आहे. गुलबर्गामध्ये रोगप्रतिबंधक लस टोचल्यानंतर मागील काही वेळेस भीतीदायक घटना घडल्या आहेत परंतु त्या पाठीमागे रुग्णांना इतर आरोग्य विषयक समस्या असल्याचे म्हंटले.
दरम्यान १० फेब्रुवारी रोजी लसीकरणानंतर ४० वर्षीय लाभार्थी असणाऱ्या महिलेला ताप आणि थंडीचा त्रास झाला. १८ फेब्रुवारी रोजी तिच्यावर बाह्यरुग्णांवर एसडीएम रूग्णालयात उपचार करण्यात आले व तेथे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.