वृत्तसंस्था/ मुंबई
लंकन क्रिकेट संघासाठी दक्षिण आफ्रिकेचे मिकी आर्थर यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून अलिकडे नियुक्ती करण्यात आली आहे. लंकन क्रिकेट संघाचा कर्णधार दिमुथ करूणारत्नने प्रशिक्षक आर्थर यांची प्रशंसा केली आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये लंकन क्रिकेट मंडळाने आपल्या राष्ट्रीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. आर्थर यांना प्रशिक्षकपदाचा अनुभव खूप वर्षांचा असून त्यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांनाही बहुमोल मार्गदर्शन केले होते. आर्थर यांचे मार्गदर्शन लंकन संघाला अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. नजीकच्या काळात लंकेचा संघ आयसीसीच्या कसोटी आणि वनडे मानांकनात पहिल्या चार संघामध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास कर्णधार करूणारत्नेने व्यक्त केला आहे.









