139 जणांच्या पथकांकडून सर्व्हे
वार्ताहर/ कराड
कोरोना नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम शहरातील 50 टक्के नागरिकांपर्यंत पोहोचली असून या सर्व्हेअंतर्गत शहरातील 10 हजार कुटुंबातील 52 हजार नागरिकांचा सर्व्हे (तपासणी) करण्यात आल्याची माहिती माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. त्यासाठी 139 जणांची नेमणूक केली आहे. पा पथकामध्ये शिक्षक, आरोग्य सेविका, मदतनीस यांचा समावेश आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. प्रत्येक शहरात, गावात या मोहिमेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कराड शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या कमी करण्याच्या दृष्टीने ही मोहीम उपयुक्त ठरत आहे. अनलॉकमध्ये जवळपास सर्वच व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिकही
खरेदीसाठी मनसोक्त बाहेर फिरत आहेत. मात्र, मास्क, तोंडाला रुमाल न बांधणे, सॅनिटायझर न वापरणे आदींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शासनाने हे अभियान सुरु केले आहे. कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन होणे आवश्यक आहे. सरकाकडून आवाहन केले जाते. मात्र तरीही गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वाचा सहभाग गरचेचा आहे. त्यादृष्टीने कराड नगरपालिका आरोग्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. या मोहिमेंतर्गत घरातील सर्वांची ऍपमध्ये नोंद घेतली जाणार आहे.
थर्मामिटरने घरातील सदस्यांचे तापमान मोजले जात असून शरीरातील ऑक्सिजनलेवल मोजली जात आहे. कुटुंबातील सदस्यांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप असल्यास त्याचीही नोंद या पथकाद्वारे घेतली जात आहे. तसेच घरातील मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, किडनी आजार आदींची माहितीही नागरिकांकडून घेतली जात आहे. कराड शहराची एकुण लोकसंख्या 86 हजार आहे. यातील 52 हजार नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे. शहराची एकुण लोकसंख्या 86 हजार आहे. त्यातील निम्म्याहून जास्त नागरिकांचा सर्व्हे झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ही मोहीम फायदेशीर ठरत आहे. नागरिकांना वेळेत उपचार मिळणे त्यामुळे शक्य झाले असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.








