प्रतिनिधी/ कराड
वाशी (नवी मुंबई )येथील श्री धनलक्ष्मी महिला मंडळ यांच्या वतीने नवी मुंबई डान्स क्वीन 2021 ने सन्मानित तसेच वाशी नवी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नृत्य कलेबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन कराडच्या कु. ऐश्वर्या कदम हिला श्री धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वाशी (नवी मुंबई) येथील श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वनिता राजे – गडदे यांनी ऐश्वर्या हिच्या कार्याची दखल घेत अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या हस्ते धनलक्ष्मी सखी सांस्कृतिक नृत्य पुरस्कार 2021 ने विष्णुदास भावे नाटय़गृहात सन्मानित केले. तर त्याच दिवशी झालेल्या नवी मुंबई डान्स क्वीन 2021 स्पर्धेमध्ये ती द्वितीय क्रमांकने विजेती झाल्याने मान्यवरांच्या हस्ते तिचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.








