क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राजस्थान येथील उदयपूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ब्लॅकबेल्ट कराटे स्पर्धेत मराठा मंडळ जिजामाता शाळेच्या प्रिया जोमने ब्लॅकबेल्टसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
राजस्थान उदयपूर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत रियाने ब्लॅकबेल्ट परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने इतर प्रकारात विजेतेपद पटकावित वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. याबद्दल मराठामंडळ जिजामातातर्फे मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई यांनी तीचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
प्रिया ही मुचंडी गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असून पिपपतच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला शारिरिक शिक्षिका अश्विनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असून, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई, शिक्षकवर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.









