वार्ताहर/ मलिकवाड
येथील विशालतिर्थ यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटातुन वाळवा येथील छत्रपती शिवाजी व्यायाममंडळाने तर मुलांच्या गटातुन बेडकिहाळ येथील सिध्देश्वर संघाने विजेतेपदासह प्रथम क्रमांकाचे 11001 रुपयाचे बक्षीस पटकावले.
ग्राम पंचायतीच्या कार्यालयासमोर पटांगणात मोठय़ा उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. मुलींच्या गटातून कर्नाटक व महाराष्ट्रातून 17 संघ सहभागी झाले होते. त्यात वाळवा येथील छत्रपती शिवाजी व्यायाममंडळाने प्रथम क्रमांकाचे 11001 रुपयाचे, बाचणी येथील जय हनुमान संघाने द्वितीय क्रमांकाचे 7001 रुपयाचे, चिंचली येथील जय महाकाली संघाने तृतीय क्रमांकाचे 5001 रुपयाचे तर नरगुंद येथील सिध्देश्वर संघाने चौथ्या क्रमांकासह 3001 रुपयाचे बक्षीस पटकावले.
मुलांच्या गटातून कर्नाटक व महाराष्ट्रातून 16 संघ सहभागी झाले होते. त्यात बेडकिहाळ येथील सिध्देश्वर संघाने प्रथम क्रमांकाचे 11001 रुपयाचे, कौलव येथील शिवमुद्रा संघाने द्वितीय क्रमांकाचे 7001 रुपयाचे, बाचणी येथील जय हनुमान संघाने तृतीय क्रमांकाचे 5001 रुपयाचे तर बाचणी येथीलच भैरवनाथ संघाने चौथ्या क्रमांकासह 3001 रुपयाचे बक्षीस पटकावले.
पंच म्हणून एम. के. शिरगुप्पे, एस. एल. प्रभात, एस. बी. चौगुला, जी. एम. चौगुला, एम. के. पुजारी, सालोटगी, तेग्गीहळ्ळी यांनी काम पाहिले. विजेत्यांना ग्राम पंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत, उपाध्यक्षा अनिता इंगळे, सदस्य बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, शमा जमादार, लक्ष्मी नडविनमनी, अनिता लक्कोळे, दिलावर नदाफ, राजु अंकले, ग्राम पंचायत विकास अधिकारी महेशकुमार, कार्यदर्शी मल्लकार्जुन कांबळे यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलीप कांबळे, अण्णासो केरुरे, चंद्रकांत शिंदे, अविनाश खोत, आप्पासाहेब नाईक, मिथुन देशपांडे, निवास करजगे, सुजित नडविनमनी, संदीप भोजने, संभाजी माने, सुरेश माने, सुभाष वडगावे, संजय वडगावे, संतोष कट्टीकर, सुनील भेंडिकटगे यांच्यासह विविध युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.









