प्रतिनिधी / कोल्हापूर
आयसोलेशन रोडवर एका दिव्यांग महिलेच्या दुचाकीचा अपघात होऊन, यात दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमी मधील मीरा गोरख नवले (वय ३५ रा. कणेरी ता. करवीर) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. संदीप शिवाजी चोरटे (वय ४०) हा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी हा अपघात झाला आहे. यांची नोंद पोलिसात झाली आहे.
दिव्यांग मीरा नवले त्यांनी नुकतीच मोपेड खरेदी केली. दिव्यांगासाठी लागणारे आवश्यक ते बदल त्यांनी मोपेडला करून घेतले. त्यानंतर त्या बुधवारी दुपारी मोपेड आणण्यासाठी कोल्हापुरात आल्या होत्या. मोपेड घेऊन त्या घरी जात असताना आयसोलेशन रोडवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यात नवले यांच्यासह संदीप चोरटे गंभीर जखमी झाले. या दोघा जखमींना त्वरीत अग्निशामक दलाच्या जवानानी कसबा बावडा येथील लाईन बाझार मधील सेवा रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान जखमी मिरा नवले यांचा मृत्यु झाला. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









