वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव एमआयडीसी कणेरी फाटा येथे अकरानंतर हॉटेल चालू ठेवल्याने गोकुळ शिरगाव पोलिसांनी हॉटेलवर केली कारवाई.
सध्या कोरोनाचे वातावरण जोरात चालू असल्याने राज्य शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत नियमांचे पालन करून ठराविक व्यवसायांना मुभा दिली आहे.
पण आज सकाळी गोकुळ शिरगाव एमआयडीसी कणेरी फाटा येथील प्रमोद बापू बेळनेकर (वय 24) रा. दत्त कॉलनी कणेरी यांनी आपले हॉटेल गुरुदत्त हे 11 नंतर सुद्धा चालू ठेवल्याने यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.









