आर्थिक गती, कारखान्यांसह अन्य सेवा प्रभावीत?
नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे तेजीत राहिले, तर दुसऱया बाजूला देशातील कोळशाच्या कमतरतेमुळे येत्या काळात महागाई वाढल्याने आर्थिक गतीवर परिणाम होणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून व्यक्त पेले जात आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण संदर्भात बैठक सुरू आहे. यामध्ये आरबीआय कोणती घोषणा करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कच्च्या तेलाचे वधारलेले भाव दुसऱया बाजूला कोळशाची भासत असणारी टंचाई यामुळे ऊर्जा क्षेत्रांशी संबंधीत काही निर्णय होणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत.
कोळसा संकटामुळे कारखाने बंद?

देशात जवळपास 70 टक्के वीज कोळशावर बनवली जाते आणि साधारणपणे 85 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. कोळशाची कमतरता राहिल्याने काही कारखाने बंद होण्याची भीती आहे. यामध्येच कच्च्या तेलाची आयात वाढविणे व आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किमत उच्चांकी पातळीवर राहिल्यास त्यांचा फटका अर्थव्यवस्थेवर होत दबाव निर्माण होऊ शकतो.









