कंग्राळी खुर्द : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागातील कोरोना विषाणू संसर्गाच्या साखळीचा अटकाव करण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून आरोग्य खात्याच्या सहकार्यातून कडक निर्बंधाबरोबरच अनके उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी कोरोना चाचणी शिबिर राबविण्यात आले. यामध्ये खासकरून कोरोनाबाधित रुग्णांच्या घरातील सदस्य आणि इतर संशयित सदस्यांचे स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली. यामध्ये 98 जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी 15 जण बाधित रुग्ण आढळले.
त्यांच्यामधील काही जणांना घरातच उपचार करण्याचे सांगण्यात आले. तर काहींना कोरोना सेंटरमध्ये दाखल केले. यावेळी आरोग्य खात्याचे डॉ. एम. एम. हुसेन, त्यांचे सहकारी यांच्यासह आशासेविका गायत्री मडिवाळ, सुषमा पाटील, अनुपमा शिवनगेकर, हेमा हावळ, माया लोहार, लक्ष्मी सुतार, निर्मला पाटील, लता पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार आदी उपस्थित होते. यावेळी आर. आय. पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांना भीती न बाळगता कोरोना चाचणी करून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.









