वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील शेतकरी सेवा संघटना व ग्रामस्थांतर्फे रविवारी झालेल्या बैलजोडीने लहान गाडा पळविण्याच्या शर्यतीमध्ये राम-लक्ष्मण सिद्धेश्वर प्रसन्न (राजहंसगड) यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. वसंत खोबाण्णा डुकरे (किणये) यांच्या बैलजोडीने दुसरा क्रमांक मिळविला.
शर्यतीमध्ये सुमारे 50 बैलजोडय़ांनी भाग घेतला होता. शर्यत उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक व ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष दत्ता पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून कंत्राटदार राजकुमार पाटील होते.
प्रारंभी यल्लाप्पा पाटील यांनी स्वागत करून शर्यत आयोजनाच्या 19 वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. दीपप्रज्वलन ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे, शिवनेरी सोसायटीचे व्हा. चेअरमन देवाप्पा निलजकर, संचालक तानाजी कोळी, सदानंद चव्हाण आदींनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन क्षत्रिय मराठा परिषद सेपेटरी ऍड. सुधीर चव्हाण यांनी केले. लक्ष्मी-सरस्वती फोटो पूजन निवृत्त जवान नितीन पवार यांनी केले. श्रीफळ दत्ता पाटील यांनी वाढविले.
संघटनेचे कार्यकर्ते मारुती पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली
वाहिली.
सदानंद चव्हाण, राजकुमार पाटील, ऍड. सुधीर चव्हाण यांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. शर्यतीचे उद्घाटन कंत्राटदार व ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे आदींच्या हस्ते गाडय़ांचे पूजन करून करण्यात आले.
बक्षीस वितरण
शर्यत समाप्तीनंतर आयोजित बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सेवा संघटनेचे अध्यक्ष गुंडू हुरुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, प्रदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयराम पावशे, लक्ष्मण हुरुडे, हभप भरमा पाटील, शेतकरी सेवा दूध डेअरीचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष बळवंत निलजकर, शाळा सुधारणा कमिटीचे माजी सदस्य मल्लाप्पा निलजकर, शिवनेरी सोसायटीचे संचालक नागेश पाटील आदी उपस्थित होते.
दत्ता पाटीलसह संघटनेचे कार्यकर्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या बैलजोडी मालकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
शर्यतीचे समालोचन बसवंत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार यल्लाप्पा पाटील यांनी केले. विजेत्या बैलजोडी मालकांची नावे खालीलप्रमाणे-
तृतीय-भरमदेव प्रसन्न (सांबरा), चौथा-श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न (मुतगा), पाचवा- महादेव प्रसन्न (सरोळी), सहावा-शिवाजी मल्लेशी कणबरकर (मुतगा), सातवा- बेनकाईदेवी प्रसन्न (बेटगेरी), आठवा-चाळोबा प्रसन्न (बुक्मयाळ), नववा-कलमेश्वर प्रसन्न (कडोली), दहावा-कलमेश्वर प्रसन्न (धामणे), अकरावा-सुशीला मारुती शिवगोंडे (यमेटी), बारावा-मरगुबाई प्रसन्न (कालकुंद्री), तेरावा-काळभैरव प्रसन्न (अनगोळ), चौदावा-बेनकाई दुर्गादेवी प्रसन्न (भेंडीगेरी), पंधरावा-ग्रामदेवी प्रसन्न (यरगोळ), सोळावा-रवळनाथ प्रसन्न (मुरकूटवाडी).









