ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक नाही. त्यामुळे या व्हेरिएंटसाठी नव्या लसीची गरज पडणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाच पट अधिक संक्रमणकारक आहे. तो वारंवार म्युटेट होत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, जागातिक आरोग्य संघटनेने याबाबत मोठा खुलासा केला आहे. ओमिक्रॉन अधिक संक्रमणकारक असला तरी तो डेल्टापेक्षा घातक नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसी नागरिकांचे संरक्षण करु शकतात. त्यासाठी भारतात बुस्टर डोसची गरज भासणार नाही.
दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंट किती घातक आहे याचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यानंतर वस्तूस्थिती जगासमोर मांडली जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे संचालक मायकल रायन यांनी सांगितले.









