नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीमधील चीनी कंपनी ओप्पोने भारतात शेकडो सेवा केंद्रे सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये 2022 पर्यंत सेवा केंद्रांची संख्या 600 पेक्षा अधिक करणार असल्याची माहिती ओप्पो कंपनीने दिली आहे.
भारतामध्ये 500 पेक्षा अधिक शहरांमध्ये विक्री सेवा दिली जात आहे. तसेच ग्राहकांना उत्पादनांसोबत अन्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ओप्पो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी दमयंत सिंह खनोरिया यांनी सांगितले आहे.









